शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जयंतरावांची ताकद अबाधित, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 5:31 PM

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.

ठळक मुद्देजयंतरावांची ताकद अबाधित, पण...बालेकिल्ल्यात विरोधकांनी दिले धक्के

युनूस शेख इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.गेल्या दोन अडीच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी धक्के दिले आहेत. इस्लामूपर नगरपालिकेतील सत्तांतर, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवत विरोधकांनी राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत चुरस अनुभवास आली. कॉँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीची सोबत घेतल्याने गेल्या दोन निवडणुकीत त्यांना मदत करणारे राष्ट्रवादी वगळता सर्व पक्ष विरोधात गेले, तर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या माने यांच्याविरोधात स्वाभिमानीसह राष्ट्रवादीची ताकद उभी ठाकली.इस्लामपूर हे मतदारसंघातील सर्वात मोठे मतदारसंख्येचे शहर. येथे आ. पाटील यांची वर्चस्व असतानाही शेट्टींना केवळ २२१७ मतांचे अधिक्य मिळाले. गेल्यावेळेपेक्षा केवळ ४१ जादा मतांची भर पडली. त्यापाठोपाठ आष्टा शहरातही शेट्टींना केवळ ७६२ मताधिक्य मिळाले. तेथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे प्राबल्य आहे.रेठरेहरणाक्ष परिसरात राष्ट्रवादीसह शेट्टींना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा वर्ग आहे. केवळ ७ बुथ असणाºया या गावात शेट्टींनी १७०९ इतके मताधिक्य घेतले.बोरगावात कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांचा गट शेट्टींविरोधात उघडपणे गेला. मात्र तरीही येथे शेट्टींना १००१ मते जादा मिळाली. साखराळेत ९१० जादा मते शेट्टींना मिळाली. वाळव्यात धैर्यशील माने यांना केवळ ३९९ मते जादा मिळाली. बावचीत शेट्टी १४८१ मतांनी पुढे राहिले. बागणीत ५०५, तर अवघे १० बुध असणाऱ्यां दुधगावात शेट्टींनी २१४५ मतांची आघाडी घेतली. शिगावात केवळ १८०, तर समडोळीत १५४५ जादा मते शेट्टी यांना मिळाली. कोरेगावात ३५४ चे अधिक्य मिळाले.मतदारसंघाच्या पूर्व भागातील कवठेपिरान (१७५८), कसबे डिग्रज (८९७) आणि तुंग (२०८) अशी आघाडी धैर्यशील माने यांनी घेतली. मतदारसंघातील मोठ्या १५ गावांपैकी, इस्लामपूर, रेठरेहरणाक्ष, बोरगाव, साखराळे, बावची, आष्टा, बागणी, दुधगाव, कोरेगाव, शिगाव, समडोळी या ११ गावांतून शेट्टी यांना १२ हजार ८०९ मतांचे अधिक्य मिळाले, तर कवठेपिरान, वाळवा, कसबे डिग्रज, तुंगमधून माने यांना ३ हजार ६२ मते जादा मिळाली. गेल्या तुलनेत शेट्टींच्या मताधिक्यात घट झाली.

टॅग्स :sangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टी