संख : बोर्गी (ता. जत) येथील उपकेंद्रात वीजपुरवठा अनियमित होत आहे. ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे देखील पुरवठा होत नाही. सतत गायब होण्याची समस्या वाढत आहे. ऐन उन्हाळ्यात लपंडावाचा फटका द्राक्षे, डाळिंब बागांना बसत आहे. वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने व वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहे.
जत पूर्व भागातील बोर्गी उपकेंद्रांतर्गत बेळोंडगी, बोर्गी
बुुद्रूक, बोर्गी खुर्द, करजगी, मोरबगी, माणिकनाळ, आक्कळवाडी या गावांंचा समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळेव्यतिरिक्तही शेती पंपाची वीज कधीही खंडित होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. नवीन रोहित्र वेळेवर दिले जात नाही. नादुरुस्त रोहित्र लवकर बदलण्यात येत नसल्याने कित्येक दिवस विजेविना बसावे लागते. याचा फटका द्राक्षे, डाळिंब, उन्हाळी पिकांना बसत आहे. परिसरात काही कूपनलिका, विहिरींना पाणी असूनही विजेच्या लपंडावामुळे पिकांना देता येत नाही.
संख व जत येथील शेतकऱ्यांनी तक्रारीची दखल न घेणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, लाईनमन विरोधात संख कार्यालयावर आंदोलने केली, मात्र कामकाजात कोणतीही सुधारणा नाही.
कोट
वीज कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांंच्या अज्ञानाचा फायदा काही कामचुकार अभियंत्यांकडून घेतला जात आहे. महावितरणने शेतीसाठी पूर्ण दाबाने व अखंडित वीजपुरवठा करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- सोमनिंग बोरामणी, अध्यक्ष, बेळोंडगी सेवा सोसायटी.