येथे सांगली रस्त्यावरील आयटीआय ते ईदगाह मैदान या रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने रस्त्यातील खांब न हटविता, गटारी न करता काम सुरू केले आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचा प्रारंभ थाटामाटाने करण्यात आला होता. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते व जत तालुका राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, नगरसेवक स्वप्निल शिंदे, नगरसेविका बाळाबाई मळगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत तो करण्यात आला होता. ठेकेदाराने खडीकरण व डांबरीकरण सुरू केले आहे. रस्त्याच्या बाजूला गटार न करताच काम सुरू केले आहे, शिवाय रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब न काढताच, काम पूर्ण करण्याची घाईगडबड सुरू केली आहे. रस्त्यावर चढउतार ठेवले आहेत. या संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच विद्युत खांब काढल्याशिवाय काम सुरू ठेवल्यास ते बंद पाडण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.
220921\img-20210922-wa0021.jpg
वीज मंडळाच्या ठेकेदाराचा अल्लडपणा रस्त्याच्या मध्येच डांब रोवला
चारचाकी वाहनांना अडथळा