संख : कोकणाला चक्रीवादळाचा फटका बसून अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला होता. महावितरणचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्यातील वीज सैनिक कोकणात धावले. त्यांनी कोकणातील कणकवली विभागामधील वीजपुरवठा सुरळीत केला.
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका बसून अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित होऊन महावितरणचे नुकसान झाले आहे.
दुष्काळी जत तालुक्यातील महावितरण कर्मचारी तेथे गेले. ते विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोकणातील कणकवली विभागामधील आचरा उपविभागातील शाखा कार्यालय रामगड मठबुद्रूक गावाची संपूर्ण लाइन पूर्ववत चालू केली.
अगोदरच कर्मचारी कमी, मात्र मागील विचार न करता ज्या ठिकाणी सध्या खरी गरज आहे, त्या ठिकाणी मदतीला जाणे महत्त्वाचे होते. त्यामुळे राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर मागचा भार सोपवून जतचे वीज सैनिक कोकणात धावले.
त्यामध्ये मुख्य तंत्रज्ञ विलास दोरकर, प्रधान तंत्रज्ञ संदिप नागमोती, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय चव्हाण, उमाजी वाघमारे, भीमराव जाधव, राजकुमार माने, राहुल चव्हाण, रामदास सुतार, संतोष बिरादार यांचा समावेश आहे.