शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

खासगीकरणाविरोधात वीज कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार, कधी?..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 5:28 PM

व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने संपूर्ण कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांच्यात कमालीची चीड

सांगली : राज्य शासनाकडून सध्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांच्या खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या खासगीकरणास तिन्ही कंपन्यांतील अभियंते, कर्मचाऱ्यांचा विरोध असल्यामुळेच दि. २८ आणि २९ मार्चला दोन दिवस संपावर जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली आहे.भोयर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, तिन्ही कंपन्यांतील अभियंता, कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्रित महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती स्थापन केली आहे. या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसूनच दि. २८ व २९ मार्चला संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत कंपन्यांच्या अस्तित्वाबाबत मात्र व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने संपूर्ण कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांच्यात कमालीची चीड आहे. त्यातही वीज उद्योगातील अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णयात संघटनांशी चर्चा न करता, एकतर्फी निर्णयाने सर्व निर्णय राबविले जातात, त्याला आमचा सक्त विरोध आहे.

सांगलीत बुधवारी निषेध सभा

संपापूर्वी तिन्ही कंपन्यांतील अभियंते, कर्मचारी दि. १६ व २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी सांगलीत द्वारसभा घेऊन शासनाचा निषेध करणार आहेत. याप्रमाणेच राज्यातील तिन्ही कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर द्वारसभा होणार आहेत. दि.२ मार्च, २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नागपूर अधिवेशनासमोर हजारो वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

आंदोलनातील मागण्या- महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपन्यांचे खासगीकरण थांबवा.- विद्युत (संशोधन) बिल २०२१ या सरकारच्या धोरणा विरुद्ध.- महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील जलविद्युत केंद्रे खासगी उद्योजकांना देऊ नयेत.- तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे त्वरित भरावेत.- तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या बदली धोरणावर होणारा एकतर्फी निर्णय बंद करा.- तिन्ही कंपन्यांतील वरिष्ठ पदावरील अनावश्यक भरती, बदल्या यातील राजकीय हस्तक्षेप थांबवा.

टॅग्स :Sangliसांगली