शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

डाळिंबाच्या बागेत गिरवले धडे, शेतीतून पाऊण कोटीचे उत्पन्न घेत प्रणवची दहावीत ४८ टक्क्यांची कमाई

By हणमंत पाटील | Published: May 30, 2024 5:52 PM

लक्ष्मण सरगर आटपाडी : शाळा ही उत्तम उत्पन्नाचे साधन निर्माण करणारी प्रयोगशाळा असल्याचे बोलले जाते. हे सिद्ध करून दाखवताना ...

लक्ष्मण सरगरआटपाडी : शाळा ही उत्तम उत्पन्नाचे साधन निर्माण करणारी प्रयोगशाळा असल्याचे बोलले जाते. हे सिद्ध करून दाखवताना केवळ चार भिंतींच्या शाळेत न रमता काळ्या मातीची सेवा करून शेती शाळेतही यशस्वी ठरलेल्या खांजोडवाडीच्या प्रणव शंकर सूर्यवंशी याने पुस्तकातल्या शाळेतही यश मिळवले. शेतीतून वडिलांच्या बराेबरीने पाऊणकाेटीचे उत्पन्न घेणाऱ्या प्रणवने दहावीतही ४८ टक्के गुणांची कमाई केली. ग्रामस्थांनीही अभिनंदनाचे फलक झळकावत त्याच्या जिद्दीचे काैतुक केले.वयाच्या सोळाव्या वर्षी प्रणव वडिलांच्या बराेबरीने आपल्या दहा एकर शेतीमध्ये वर्षाकाठी पाऊणकोटीचे उत्पन्न घेत आहे. डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाणारे आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीत सूर्यवंशी कुटुंबानेही डाळिंब बाग केली आहे. दर्जेदार डाळिंब पीक घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. पिढ्यान्पिढ्या शेती हाच व्यवसाय असलेला प्रणव चार भिंतीच्या शाळेत कधी रमलाच नाही.त्याला डाळिंबाच्या शाळेनेच भुरळ घातली होती. अगदी लहान वयापासूनच फक्त डाळिंब शेती हीच आपली शाळा असे त्याचे म्हणणे असे. चार भिंतीच्या शाळेकडे त्याचा ओढा कमीच... मात्र मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ४८ टक्के गुणांसह उत्तीर्ण होत त्याने कुटुंबासह गावालाही आश्चर्यचकित केले आहे.

कायमच डाळिंब शेतीत रममाण असलेल्या प्रणवने शालेय अभ्यासक्रमात कधी रुची दाखवलीच नाही. भारत देश कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. सध्या नाेकरीआधारित शिक्षणाकडे तरुणांचा कल वाढला आहे. मात्र, प्रणव शिक्षणाबरोबरच शेती हेच उत्तम साध्य समजून शेतीशीच एकनिष्ठ आहे.आजच्या युवकांनी शिक्षणाबराेबर उत्तम शेती केल्यास अर्थार्जन तर होतेच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावल्याचे समाधान मिळते. शिक्षणासोबत शेतीलाही महत्त्व देणे गरजेचे असल्याचे प्रणवने दाखवून दिले आहे.

डाळिंबाच्या बागेत गिरवले धडेसध्या दहावीला खासगी क्लासचे फॅड आहे. मात्र, प्रणवने क्लास काय शाळेकडेही पाठ फिरविली. डाळिंबाच्या बागेत काम करीत जमेल तेवढा अभ्यास करून ४८ टक्क्यांची कमाई केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करण्यासाठी गावात अभिनंदनाचे फलक लावले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीSSC Resultदहावीचा निकाल