शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

सांगलीच्या दहा वर्षीय प्रांजलने सर केला अलंग मदन कुलंग रेंज, दहा वर्षांत ३५ किल्ले सर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 4:28 PM

छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत गाठले ध्येय

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करीत दहा वर्षीय सांगलीच्या प्रांजल बावचकरने अलंग-मदन-कुलंग हे दुर्ग त्रिकुट सर केले. सांगलीच्या १८ ट्रेकर्समध्ये प्रांजली ही सर्वांत लहान ट्रेकर होती.सांगलीच्या सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्रातील सर्वांत अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग-मदन-कुलंग हा रेंज ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या सह्याद्री डोंगररांगेतील कळसूबाई शिखराच्या जवळच असणारे हे जोडकिल्ले साहसी ट्रेकर्सना नेहमीच भुरळ घालत असतात. चढाईच्या दृष्टीने अतिशय अवघड समजला जाणारा हा ट्रेक सांगलीच्या प्रांजल सचिन बावचकर या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीने सर्व सुरक्षा साधनांचा वापर करत संयमाने आणि धाडसाने पूर्ण केला.ट्रेकमध्ये एका ठिकाणी ६० फूट आणि एका ठिकाणी ४० फुटांचे रॅपलिंग (दोरीवरून चढून जाणे) करावे लागते. अनेक ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. जिथून खाली पाहिले की काळजात धडकी भरते. गडावर गेले की भंडारदरा धरण, रतनगड, सांधण व्हॅली, हरिश्चंद्रगड, आजोबा डोंगर, कळसूबाई शिखर यांचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते. मागच्याच वर्षी प्रांजलने मोरिशीचा भैरवगड हा माळशेज घाटातील अवघड ट्रेक पूर्ण केला आहे.

दहा वर्षांत ३५ किल्ले सरप्रांजलने आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास ३५ किल्ले सर केले आहेत. लहानपणापासूनच प्रांजलला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. प्रांजल सध्या इयत्ता चौथीमध्ये आहे.

आव्हानात्मक ट्रेक

अलंग-मदन-कुलंग म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसूबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटीपासून ४८०० फूट उंचीवर आहेत.

टॅग्स :Sangliसांगली