गोटखिंडी : जयंत पाटील यांच्या माध्यमातून बावची गावासाठी भरीव निधी मिळाला आहे. यातून गावातील सर्व समाजघटकांना योग्य प्रमाणात विकासकामे दिली आहेत. कार्यकर्त्यांनी सर्व कामे दर्जेदार करून घ्यावीत, असे प्रतिपादन युवक नेते प्रतीक पाटील यांनी केले.
बावची (ता. वाळवा) येथे विविध योजनांमधून २६ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजश्री एटम, वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील, सरपंच वैभव रकटे, राजारामबापू बॅंकेचे संचालक विजयराव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुस्लिम समाजाने नवीन शादीखाना इमारतीचा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी प्रतीक पाटील यांना निवेदन दिले. पाटील यांच्या हस्ते जनसुविधा, नागरी सुविधा व दलित वस्ती सुधार योजनेतून सिद्धार्थनगर येथे काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे, नवीन वसाहतीत रस्ता डांबरीकरण, मुस्लिम समाज दफनभूमी, संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच अनिल शिंगारे, वंदना शिंदे, संभाजी पाटील, सतीश पाटील, नितीन पाटील, भूपाल यादव, संभाजी मस्के, संजय जाधव, लालासाहेब अनुसे, इकबाल तांबोळी, अख्तर तांबोळी, हमजू मुजावर उपस्थित होते.
फोटो : १२ गाेटखिंडी १
ओळ : बावची (ता. वाळवा) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ प्रतीक पाटील, नेताजी पाटील, सरपंच वैभव रकटे यांच्या हस्ते करण्यात आला.