शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

सांगलीच्या प्रतीक मंत्री, इस्लामपूरच्या अजिंक्य मानेचा युपीएससीत झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 7:39 PM

सांगली/इस्लामपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगलीचा प्रतीक मंत्री व इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी यशोशिखराला गवसणी घातली. प्रतीकने गुणवत्ता ...

सांगली/इस्लामपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगलीचा प्रतीक मंत्री व इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी यशोशिखराला गवसणी घातली. प्रतीकने गुणवत्ता यादीत २५२ वे स्थान पटकाविले, तर अजिंक्यने ४२४ वा क्रमांक मिळविला. ध्येयप्राप्तीसाठी जिद्द आणि कष्टाची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते, अशी प्रतिक्रिया अजिंक्यने व्यक्त केली.प्रतीक मंत्री याने तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले. सांगलीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या नंदकिशोर मंत्री यांचा तो मुलगा आहे. सोमवारी दुपारी परीक्षेचा निकाल जाहीर होताच जिल्हा बँकेमागील त्याच्या घरी अभिनंदनासाठी मित्र, नातेवाईकांची रीघ लागली. अभियांत्रिकीमध्ये मुंबईतून बी.टेक्. पदवी मिळविलेल्या प्रतीकने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

इस्लामपुरात अजिंक्यच्या घरीही अभिनंदनासाठी गर्दी झाली होती. अभिनंदनाचा वर्षाव झेलतच त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याचे माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात आदर्श हायस्कूलमध्ये, तर बी.ई. यांत्रिकीचे शिक्षण आरआयटीमध्ये झाले. सुरतमध्ये एम.टेक्. पूर्ण केले. शिक्षणानंतर पुण्यात दोन वर्षे नोकरीही केली. २०१८ पासून युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतरही जिद्द कायम ठेवत तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले.माने कुटुंब नेर्ले (ता. वाळवा) येथील असून सध्या इस्लामपुरात मंत्री कॉलनीत राहते. अजिंक्यचे आई व वडील माध्यमिक शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. मोठा भाऊ अभिजित जर्मनीमध्ये मोटारगाडी उत्पादक कंपनीत अधिकारी आहे. तिसरा भाऊ अमितकुमार यांनीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश मिळवले आहे. ते सध्या देहूरोड येथील लष्करी तळावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत आहेत. यशात आई, वडिलांचे प्रोत्साहन व मोठ्या भावांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली.

सातत्यपूर्ण अभ्यास, अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण आणि ऐच्छिक विषय घेतलेल्या समाजशास्त्राचा गांभीर्याने अभ्यास केल्याने यश मिळवू शकलो. रोज आठ ते दहा तास अभ्यास, सरावावर भर, मुद्दे काढून त्यांचे विश्लेषणात्मक लिखाण आणि चिंतन, मनन असा अभ्यास केल्यास हमखास यश मिळू शकते. तयारी आणि कष्टाची लालसा असायला हवी. - अजिंक्य माने

टॅग्स :Sangliसांगलीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा