युवा वर्गाला व्यायामाची आवड निर्माण व्हावी व लष्करात भरती होणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी येथील आजी-माजी सैनिक संघटनेने मॅरेथॉन स्पर्धा भरविल्या होत्या. तालुकाध्यक्ष बाळकृष्ण सावंत यांच्याहस्ते उद्घाटन झाले. वाघवाडी ते रेठरे धरण व शिवपुरी रस्त्यावर हे स्पर्धक धावले.
१६०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस २००१ रुपये व शिल्ड ओंकार कुंभार (इचलकरंजी) याने, तृतीय क्रमांकाचे बक्षीस १००१ रुपये व शिल्ड करण दिंडे (सातवे) याने, तर उत्तेजनार्थ बक्षीस महेश पवार (सातारा) याने पटकावले. पाच किलोमीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक २००१ रुपये व शिल्ड धुळदेव घाटगे (सांगली) याने, तृतीय क्रमांक १००१ रुपये व शिल्ड महेश खामकर (सातवे) यांने मिळविला.
स्पर्धेला जालिंदर पाटील, संजय जाधव, सचिन पवार, बाबासाहेब धुमाळ, रमेश चौगुले, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे आयोजन माजी सैनिक नागेश वाघ, शिवाजी वाघ, सुनील बांदल, प्रशांत कांबळे, कपिल वाघ, धीरज शेवाळे, प्रमोद खामकर, वैभव मोरे, शुभम कदम यांनी केले.
स्पर्धेसाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशेवर युवकांनी हजेरी लावली होती.