मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या कोरड्या कालव्यामध्ये भजन आंदोलन केले. भर उन्हात सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ पाणी न सोडल्यास आंदोलन तीव्र करू, प्रसंगी मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
मिरज पूर्व भागात पाणी टंचाईने शेतातील पिके धोक्यात आली आहेत. पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन काँग्रेस व राष्टÑवादीतर्फे तहसीलदारांना दिले होते. दहा दिवसात पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. मुदतीत पाणी सोडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी बेडग येथील हुलेगिरी फाट्यावरलील टप्पा क्रमांक तीनच्या कोरड्या कालव्यामध्ये बसून भजन आंदोलन कले. अकराच्या सुमारास पंप हाऊसच्या आवारात शेतकºयांनी भजनाला सुरुवात केली. अन्य शेतकरी सहभागी झाल्यानंतर भजन म्हणत कोरड्या कालव्यामध्ये आंदोलनकर्ते उतरले. तेथे भर उन्हात ठिय्या मारून भजन सुरू केले.
सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी सलगरचे सरपंच तानाजी पाटील म्हणालेकी, सध्या पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनत असल्याने म्हैसाळ योजना कार्यान्वित करावी, अशी निवेदनाव्दारे तहसीलदारांकडे मागणी केली होती. योजना सुरू करण्यासाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा पाहिला टप्पा म्हणून भजन आंदोलन करण्यात आले. राज्य शासन बँक, देवस्थानांना हजारो कोटींचा निधी देते. उद्योगपतींचे कर्ज, व्याज माफ करते, मात्र म्हैसाळ योजनेचे ५ कोटींचे थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करीत नाही. शासनाने टंचाई निधीतून वीज बिल भरून योजना सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे. माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, तानाजी पाटील, माजी सभापती दिलीप बुरसे, बाळासाहेब होनमोरे, सिध्दार्थ जाधव, अण्णासाहेब कोरे, बाळासाहेब नलवडे, सुरेश कोळेकर सहभागी होते.
मंत्र्यांना फिरकू देणार नाहीआमदार सुरेश खाडे हे टंचाईतून पाच कोटींचा निधी मंजूर असल्याने योजना लवकरच सुरू होणार असल्याचे ते सांगत असले तरी,ती नेमकी कधी सुरू होणार, हे मात्र ते सांगत नाहीत. आ. खाडे हे खोटे बोलून शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. भाजपचे सरकार असल्याने त्यांनी म्हैसाळ योजनेचा थकीत बिलाचा प्रश्न निकालात काढून योजना सुरू करावी, शेतकºयांच्यावतीने आम्ही त्यांचा चांदीचा गदा देऊन सत्कार करू, योजना सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजपच्या मंत्र्यांना भागात फिरकू देणार नसल्याचा इशारा माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी दिला.