सांगली : महापालिकेच्या वतीने थकीत घरपट्टी धारकांना जप्तीपूर्व नोटीसा बजावल्या जात आहे. आत्तापर्यंत २५ हजार जणांना नोटीसा दिल्या आहे. यात अगदी दोन-चार हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या घरपट्टीधारकांचा समावेश आहे. कोरोनानंतर घरपट्टी कराच्या थकबाकीत मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२३ अखेर घरपट्टीची थकबाकी ५८ कोटीच्या घरात आहे. तर यंदाचे चालू वसुली ५० कोटी अपेक्षित आहे. महापालिकेने १०८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी घरपट्टीधारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. एक वर्षापेक्षा अधिक काळ थकबाकी असलेल्या नागरिकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. एकीकडे लाखो रुपयांची घरपट्टी थकीत असलेल्या थकबाकीदारांवर महापालिकेकडून काहीच कारवाई होत नाही. वर्ष प्रत्येक वर्षाला नोटिसा बजाविण्यापलीकडे मालमत्ता विभागाने कारवाई केलेली नाही. दुसरीकडे एका वर्षाची घरपट्टी थकीत गेली म्हणून जप्तीच्या नोटिसा काढल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
सांगली महापालिकेकडून २५ हजार जणांना जप्तीपूर्व नोटिसा, नागरिकातून संताप
By शीतल पाटील | Published: October 02, 2023 6:10 PM