शीतल पाटील ।
महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. प्रशासनालाही सहकार्य करते. त्यामुळे चांगले काम करता येईल - नितीन कापडणीस
सांगली महापालिकेचे चार वर्षे उपायुक्त म्हणून काम केल्यानंतर आता आयुक्त म्हणून रूजू झालेले नितीन कापडणीस यांच्याशी शहरातील समस्या, भविष्यातील व्हिजन, विकासकामे,
फायलींचा निपटारा याबाबत केलेली बातचित...प्रश्न : महापालिकेच्या विकासाबाबत आयुक्त म्हणून आपले व्हिजन काय आहे?उत्तर : महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. या शहरात मोठे प्रकल्प व भरीव कामे करण्यावर भर राहणार आहे. उद्याने, क्रीडांगणे, फुड झोन, रस्ते अशी मोठी कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. महापालिकेकडे अनेक मोकळे भूखंड आहेत. तेथे हे प्रकल्प उभे राहू शकतात. रुग्णालयांची स्थिती सुधारण्याचा ‘अॅक्शन प्लॅन’ही तयार करीत आहोत. जनतेचा जास्तीत जास्त फायदा होईल, अशीच कामे करणार आहोत.
प्रश्न : माजी आयुक्त व सत्ताधाऱ्यांत संघर्ष झाला. त्या पार्श्वभूमीवर आपण आयुक्तपदाचा कार्यभार घेतला. त्यांच्याशी समन्वय कसा साधणार?उत्तर : महापालिकेत चार वर्षे उपायुक्त म्हणून काम केले आहे. येथील पदाधिकारी, नगरसेवक, जनता या साऱ्यांशी जुळवून घेऊन त्यांच्याशी समन्वय साधून काम करू. कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही. प्रत्येक निर्णयात सर्वांना सामावून घेतले जाईल.
प्रश्न : विकासकामे, फायलींचा निपटारा याचे काय नियोजन केले आहे?उत्तर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी वर्ग तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यांच्याबद्दल जनतेचा जो समज झाला आहे, तो प्रथम बदलावा लागेल. त्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आर्थिक नियोजन. महापालिकेचे वर्षभरातील उत्पन्न, शासनाकडून येणारा निधी, मोठ्या योजनांच्या पूर्ततेसाठी खर्च होणारा निधी या साºयाची सांगड घालून उरलेल्या पैशातून विकासकामे करण्यावर भर राहणार आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही पावले उचलत आहोत.प्रभाग समित्या सक्षम करणारमहापालिकेच्या चार प्रभाग समित्या सक्षम करण्यावर भर आहे. समितीच्या सहायक आयुक्तांनाही काही अधिकार दिले जातील. पण त्यासाठी सक्त नियम व अटी तयार करणार आहोत. जेणेकरून त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही.रस्ते रुंदीकरण करणारअतिक्रमणाबाबत योग्य ते नियोजन केले जाईल. प्राधान्याने रस्ते रुंदीकरणावर भर आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणार आहोत. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल.स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करूमहापालिकेच्यावतीने स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचे नियोजन करीत आहोत. महिन्यातून एकदा आयएएस, आयपीएस अधिकाºयांचे मार्गदर्शन शिबिर घेणार आहोत. त्यातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होईल.