मिरज तालुक्यात माॅडेल स्कूलसाठी जिल्हा परिषदेकडून १५ व राज्यांकडून १ अशा १६ शाळांची निवड झाली आहे. विविध विभागांतर्गत मिळणाऱ्या निधीतून वाचनालय, संगणक कक्ष, शौचालय, क्रीडांगण यांसह इतर भौतिक सुविधा या शाळांना मिळणार आहेत. सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, गटशिक्षणाधिकारी प्रसाद सांगोलकर, विस्तार अधिकारी गणेश भांबुरे यांच्यासह अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यांनी कवठेपिरान, डिग्रज, खटाव, मालगाव, सिद्धेवाडी यासह निवड झालेल्या इतर शाळांना भेटी देऊन नियोजन सुरू केले आहे.
तालुक्यातील निवड झालेल्या शाळांच्या विकासकामांचे उद्घाटन सभापती त्रिशला खवाटे व उपसभापती अनिल आमटवणे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
चौकट
गुणवत्ता विकास
शिक्षकांची जबाबदारी
माॅडेल स्कूल अभियातून प्राथमिक शाळांचा विकास साधला जाईल. इतर अडीअडचणी आपण व अधिकारी सोडवू; मात्र शाळा विकासाबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील खासगी शाळांचे आव्हान मोडून काढण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्याची जबाबदारी पूर्ण करावी, अशी सूचना सभापती त्रिशला खवाटे, उपसरपंच अनिल आमटवणे यांनी केली.
चौकट -
दर्जाबाबत तडजोड नाही
माॅडेल स्कूल अभियानांतर्गत ज्या शाळांची निवड झाली आहे. त्या शाळांच्या विकासकामांच्या मजुरी व ई-टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन सभापती त्रिशला खवाटे व उपसभापती अनिल आमटवणे यांच्या हस्ते कामांना सुरुवात झाली आहे. कामांच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही. कामात प्रादर्शकता राहील, असे गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी सांगितले.