सांगली : महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.सांगलीत बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी उपनेते नितीन बानगुडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, शेखर माने, सुवर्णा मोहिते, महादेव मगदूम, शंभोराज काटकर उपस्थित होते. रावते म्हणाले की, जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शिवसेनेने अतिशय चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आहे. युतीबाबत बोलणे सुरू आहे, परंतु गाफील न राहता, युती झाली तर युतीच्या उमेदवारासाठी, नाही झाली तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करण्याची तयारी ठेवावी.बानुगडे-पाटील म्हणाले की, सांगली शहरासह ग्रामीण भागामध्ये महापुराने थैमान घातले होते. अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी एकजुटीने पूरग्रस्तांना मदत केली आहे.मेळाव्यास दिनकर पाटील, संजय काटे, मयूर घोडके, तानाजी सातपुते, हरी लेंगरे,अमोल काळे, संदीप गिड्डे, चंद्रकांत मैगुरे, अमोल पाटील, रुपेश मोकाशी, भाऊसाहेब कोळेकर, विशालसिंग राजपूत, युवराज मस्के, धैर्यशील मोरे आदी उपस्थित होते. आभार तानाजी सातपुते यांनी मानले.
जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 5:41 PM
महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
ठळक मुद्दे जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा