शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बेदाण्याचे दर वाढणार, मात्र पदरात अवकाळीचा फटका ;सांगली जिल्ह्यातील उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 9:53 PM

सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठेत अनेक अडचणींचा सामना

सांगली : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असतानाच, आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम बेदाणा उत्पादनावर होणार असून बेदाण्याचे उत्पादन कमी असल्याने दरात वाढ होणार असली तरी, अवकाळीमुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांत ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे.राज्यातील सर्वाधिक बेदाण्याचे उत्पादन जिल्ह्यात होत असते. त्यामुळे बेदाण्याच्या उलाढालीसाठी सांगलीची बाजारपेठ संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दिवाळीच्या एक महिन्याच्या सुटीनंतर सांगली व तासगाव येथील बेदाणे सौदे सुरू झाले असले तरी, मालाच्या आवकेवर दर अवलंबून आहेत. सध्या दरामध्ये सरासरी २५ ते ३० रुपयांची वाढ दिसून येत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा थेट परिणाम यंदा बेदाणा उत्पादनावर दिसून येणार आहे.अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने मार्केटिंगसाठीही अडचणी आल्या आहेत. सध्या दर्जानुसार २०० ते ४०० रुपये प्रती चार किलोचा दर असला तरी, यापुढे येणाºया मालावर मर्यादा येणार आहेत. आॅक्टोबरमध्ये छाटण्या घेतलेल्या बागांचा माल फेब्रुवारीमध्ये येणार असून, त्याचे बहुतांश बेदाणा उत्पादन होणार आहे. या सर्व अडचणींचा सामना सध्या बेदाणा उत्पादन करणाºया शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांचा प्रचंड खर्च : चिंतेचे वातावरणअवकाळीमुळे सलग पंधरा दिवस बागांमध्ये पाणी साचून होते, तर त्यानंतरही चिखल असल्याने शेतकऱ्यांना या अडचणीतून बागा वाचविताना मोठी कसरत करावी लागली आहे. औषधांवर व मजुरीवर प्रचंड खर्च झाल्याने यंदा दर चांगला मिळण्याची शक्यता असली तरी, खर्चही दुपटीने वाढल्याने वाढीव दर मानवणार नसल्याचे चित्र आहे.

बेदाण्याची आवक घटणारसांगली, पंढरपूर, विजयपूर भागात बेदाणा उत्पादन होत असले तरी, सर्वाधिक उत्पादन हे जिल्ह्यातच होत असते. बेदाणा उत्पादनावर अवकाळीचा चांगला परिणाम होणार असल्याने सध्या आवक समाधानकारक असली तरी, पुढील काही महिन्यात आवकेवर चांगलाच परिणाम होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग