शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

सांगलीच्या काजल सरगरचा मोदींकडून ‘मन की बात’मध्ये गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 3:52 PM

मोदी यांच्या कौतुकाने काजलच्या पदकाची सुवर्ण झळाळी आणखी वाढली

सांगली : ‘सांगली की काजल सरगर की मेहनत रंग लाई’ या गौरवपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगलीच्या यशवंत, गुणवंत कन्येवर कौतुकाची पुष्पवृष्टी केली. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये काजल सरगरने सुवर्णपदक पटकाविले होते. महाराष्ट्राला स्पर्धेत सुवर्णपदकाचे खाते उघडून देणारी काजल सांगलीकरांच्या कौतुकाला पात्र ठरली होती. आता खुद्द प्रधानमंत्र्यांनीच दखल घेतल्याने तिच्या यशाला चार चांद लागले आहेत.रविवारी (दि. २६) पंतप्रधानांचा ‘मन की बात’चा ९० वा भाग प्रसारित झाला. त्यामध्ये मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरुणवर्गाच्या विविध क्षेत्रांतील भराऱ्यांची दखल घेतली. अनेक उल्लेखनीय स्टार्टअप्सचा उल्लेख केला. क्रिकेटपटू मिताली राजची खेळी स्मरणात राहील, असे सांगितले. खेलो इंडियामध्ये खेळाडूंनी बारा विक्रम मोडल्याचे, तसेच अकरा नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल कौतुक केले. देशभरातील पदकप्राप्त खेळाडूंचा उल्लेख करताना सांगलीच्या काजलचाही गाैरव केला.नरेंद्र मोदी म्हणाले, सांगलीच्या काजल सरगरने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळविले. तिचे आई-वडील चहाचा गाडा चालवितात. काजलदेखील वडिलांना व्यवसायात मदत करते. अशा कष्टमय स्थितीतही तिने सराव केला आणि पदकाला गवसणी घातली. काजलवर कौतुकाचा वर्षाव झाला. तिच्या यशात माता-पित्यांचाही मोठा हातभार आहे.

पदकाची झळाळी वाढली

मोदी यांच्या कौतुकाने काजलच्या पदकाची सुवर्ण झळाळी आणखी वाढली आहे. संजयनगरमध्ये छोट्याशा कुटुंबात राहून शिक्षणासोबतच वेटलिफ्टिंगचे धडे गिरवणाऱ्या काजोलने सांगलीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात नेले, शिवाय मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनाही सांगलीची दखल घ्यावीशी वाटली. काजलचा भाऊ संकेत हादेखील वेटलिफ्टिंगमध्ये नाव मिळवून आहे. त्यांच्या आई-वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा देऊन मुलांच्या खेळासाठी खर्च केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीKhelo Indiaखेलो इंडिया