याप्रकरणी जुगार अड्डा मालक मोहसीन सलिम शेख (वय ३२, रा. मालगाव रोड, मिरज) याच्यासह सरफराज वाहीद बारगीर (३२), तौसिफ अस्लम मुल्ला, हुसेन शफीक खाटीक (२९, तिघेही रा. बोकड चौक, मिरज), यासिन शमशुद्दीन जमादार (२६, रा. गोठण गल्ली, मिरज), नौशाद मेहबूब शेख (३७, रा. अमननगर, मिरज), जमीर सिकंदर शेख (३०, मुजावर गल्ली, मिरज), सलिम रशिद पठाण (४१, रा. दत्तनगर, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कडक कारवाईचे निर्देश अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज शहरात गस्तीवर असताना, मालगाव रोडवरील स्वामी समर्थ कॉलनीत मोहसीन शेख हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने छापा टाकून जागीच सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जुगारातील रोख रक्कम ४९ हजार ९१० रुपयांसह मोबाईल असा १ लाख २ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, शशिकांत जाधव, मुद्दसर पाथरवट, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.