विटा : विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेने अल्पावधीत मोठा विश्वास संपादन करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आपला विस्तार केला आहे; पण आपल्या भागाशी संस्थेची नाळ कायम आहे. आपल्या भागातील लोकांना विशेषतः महिला व युवकांच्या हाताला काम मिळून ते आत्मनिर्भर झाले पाहिजेत. त्यासाठी भाळवणी (ता. खानापूर) येथे शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ‘शिवप्रताप’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थचक्र गतिमान करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही संस्थापक अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी दिली.
विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेच्या भाळवणी शाखेचे उद्घाटन अध्यक्ष साळुंखे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, किसनराव निकम, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, संस्थेचे उपाध्यक्ष हणमंतराव सपकाळ, संचालक आलम पटेल, गोपाळ तारळेकर, सुरेखाताई जाधव, नितीनराजे जाधव, अमोल माळी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी संस्थेचा व्यवसाय २८५ कोटी असून, ठेवी १६५ कोटी, कर्जे १२१ कोटी, गुंतवणूक ६० कोटी व नफा १ कोटी ८१ लाख असून, संस्थेला १५ आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास दिशांत धनवडे, जि. प. सदस्य सुलभा अदाटे, महेश घोरपडे, सरपंच विमलताई माळी, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष सयाजीराव धनवडे, प्रवीण पवार, कळंबीचे उपसरपंच उत्कर्ष कदम, केशवराव धनवडे, मारुती पवार, धनाजी शिंदे, राजेंद्र शिंदे, जयसिंग शिंदे, सागर सूर्यवंशी, राजेंद्र निकम, नेताजी शिंदे, अरविंद गायकवाड, उत्तमराव गायकवाड, लाला हारुगडे, रमेश शिरतोडे, दयानंद शिरतोडे, सुरेश नलवडे, मधुकर नलवडे, प्रवीण नलवडे, सुनीता सावंत उपस्थित होते. उद्धव रावताळे यांनी आभार मानले.
फोटो : २० विटा १
ओळ : विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या भाळवणी शाखेचे उद्घाटन संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव साळुंखेे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुलभा अदाटे, सयाजीराव धनवडे, विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते.