दिलीप मोहिते।विटा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री काँग्रेसमधील विटा शहरातील व तालुक्यातील गटबाजी अनुभवली. पालिकेत पृथ्वीराजबाबा, माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास खलबते झाली, पण त्यातील माहिती समजू शकली नसली तरी, विटा शहराच्या पश्चिमेकडून म्हणजे कडेगावकडून खानापूर तालुक्यात सोडण्यात येणाºया राजकीय ‘क्षेपणास्त्रांवर’ चर्चा झाल्याचे समजते.
बुधवारी जत तालुक्याच्या दौºयावर असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांनी जतहून निघताना अचानक विटामार्गे कºहाडला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बाबांनी माजी आ. पाटील यांना भेटण्यास येत असल्याचा निरोप पाठविला. सदाभाऊंनी पालिकेत जय्यत तयारी केली. याची माहिती माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम समर्थक गटाला मिळताच, या गटातील कार्यकर्त्यांनीही विटा बसस्थानकासमोर एकत्रित येऊन बाबांना थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाबांना बसस्थानकासमोर थांबविण्यात आले. कदम समर्थक माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, रघुराज मेटकरी, डी. के. कदम, माजी उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी आदींनी बाबांना एका शीतपेयाच्या दुकानात नेऊन तेथे फोटोसेशन केले. त्यानंतर बाबांचा ताफा विटा पालिकेकडे रवाना झाला.
पालिकेसमोर सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील प्रवेशव्दारात होते. त्यांनी बाबांचे स्वागत केले. सदाभाऊ, वैभवदादा, उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मुख्याधिकारी महेश रोकडे व नगरसेवकांनी पालिकेचे कामकाज व कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर नगराध्यक्षांच्या अॅँटीचेंबरमध्ये बाबा, सदाभाऊ, वैभवदादा तसेच कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात सुमारे पाऊण तास गुप्त चर्चा झाली.
या चर्चेतील माहिती मिळू शकली नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत सदाभाऊंनी पालिकेवर कॉँग्रेसचा झेंडा फडकविल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कदम गटाचा हस्तक्षेप व पक्षांतर्गत गटबाजीमुळे सदाभाऊ नाराज झाले. त्यातून ते कॉँग्रेसच्या कामात जास्त सक्रिय दिसले नाहीत. त्यामुळेच त्यांची नाराजी काढण्याबाबत बाबांनी विटामार्गे कºहाडला जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.या सर्व प्रकारात पृथ्वीराजबाबांनी खानापूर तालुक्यातील कॉँग्रेस पक्षांतर्गत असलेली कदम-पाटील समर्थकांची गटबाजी चांगलीच अनुभवली.प्रवेशाला ब्रेक?कॉँग्रेस पक्षांतर्गत नेत्यांच्या गटबाजीमुळे नाराज झालेल्या माजी आ. सदाभाऊंना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खुले आवाहन करण्यात आले. त्यामुळे पृथ्वीराजबाबांनी सदाभाऊंना भेटून पक्ष न सोडण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. ही चर्चा झाल्याने आता सदाभाऊ, वैभवदादांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागण्याचे संकेत आहेत. सदाभाऊ हे पक्षातील एक ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे महत्त्व ओळखूनच पृथ्वीराजबाबांनी त्यांच्याशी खलबते केल्याचे समजते. या चर्चेचे फलित काय होणार, याकडे आता तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.