सुरेंद्र दुपटेसंजयनगरः बामणोली (ता. मिरज) येथील सामान्य कुटुंबातील सायकलपटू प्रियांका शिवाजी कारंडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. गावातून मिरवणूक काढून तिचे स्वागत करण्यात आले.प्रियांकाच्या घरची परिस्थिती बेताची होती. सायकल घेण्याचीही आयपत नव्हती. स्पर्धेसाठी तिच्याकडे चांगली सायकल नव्हती. अखेर आईचे मंगळसूत्र गहाणवट ठेऊन कर्ज काढण्याची वेळ आली. उद्योजक सतिश मालु यांनीही मोलाची साथ दिली. वडीलांनी कर्ज काढले व स्पर्धेसाठी दोन लाखाची सायकल घेतली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जात तिने स्पर्धा जिंकली. सायकलिंगबरोबर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात तीने यश मिळविले. प्रियांकाने तिच्या यशाचे श्रय वडिल शिवाजी, आई वैशाली, भाऊ रणजित, बहिण दिपाली व नातेवाईक यांना दिले. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल गावातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सांगलीतील बामणोलीची सायकलपटू बनली पोलिस उपनिरीक्षक, आईचे मंगळसूत्र ठेऊन कर्ज काढण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 1:51 PM