शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लिलाव प्रक्रियेनंतरही वसुलीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 8:18 PM

सांगली जिल्हा बॅँकेच्या कृषी आणि अकृषिक कर्जाच्या थकबाकीचा डोंगर मोठा असल्याने त्यांच्या वसुलीचा प्रश्न बॅँकेसमोर निर्माण झाला आहे. सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत बॅँकेने सात बड्या संस्थांचा लिलाव जाहीर केला असला तरी, उर्वरीत आणखी आठ बड्या संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया मार्चनंतरच जाणार आहे. त्यामुळे वसुलीचा प्रश्न कायम राहणार आहे.

ठळक मुद्देलिलाव प्रक्रियेनंतरही वसुलीची समस्याकारवाईची प्रक्रिया मार्चनंतरच, वसुलीचा प्रश्न कायम

सांगली : जिल्हा बॅँकेच्या कृषी आणि अकृषिक कर्जाच्या थकबाकीचा डोंगर मोठा असल्याने त्यांच्या वसुलीचा प्रश्न बॅँकेसमोर निर्माण झाला आहे. सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत बॅँकेने सात बड्या संस्थांचा लिलाव जाहीर केला असला तरी, उर्वरीत आणखी आठ बड्या संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया मार्चनंतरच जाणार आहे. त्यामुळे वसुलीचा प्रश्न कायम राहणार आहे.एकीकडे कृषी कर्जाचा दरवर्षी फटका बसत असताना, दुसऱ्या बाजूस बिगरशेती कर्जदार संस्थाही अडचणीत आल्या आहेत. शेतीकर्जातून तोटा सोसणाऱ्या सांगली जिल्हा बँकेला दरवर्षी बिगरशेती कर्जातून मोठा नफा मिळत असतो. यंदा तशी परिस्थिती नाही.

जवळपास १२ संस्थांकडे ४५0 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यासाठी या संस्थांवर सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील केवळ सात संस्थांच्या लिलाव प्रक्रियेतून सुमारे अडीचशे कोटी रुपये मार्चअखेर मिळणार आहेत.

उर्वरित २00 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी बँकेला एप्रिल किंवा मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या नफ्यावर त्याचा परिणाम दिसून येईल. दरवर्षीप्रमाणे नफा होणार असला तरी, त्याचे प्रमाण कमी होणार आहे. एकीकडे नफा मिळविताना एनपीएचे प्रमाण वाढू नये म्हणून बँकेला दक्षता घ्यावी लागेल. सध्याचा एनपीए ११.८३ टक्के इतका असून, तो १४ टक्क्यांवर जाऊ नये म्हणून बँकेची धडपड सुरू आहे. एनपीए वाढला तर बँकेसमोरील अडचणी वाढू शकतात.जिल्हा बँकेस २0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. २0१७-१८ या आर्थिक वर्षापेक्षा ३२ कोटींनी मागीलवर्षी नफा वाढला होता. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून गेल्या चार वर्षात सातत्याने नफावृद्धी होत आहे. मात्र संचालक मंडळाच्या अंतिम वर्षात हा नफा घटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली