संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : पिकाचे योग्य नियोजन व वेळेत औषध फवारणी करून अस्मानी संकटातही चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाकळी (ता. मिरज) येथील शेतकरी सुधीर जनगोंडा पाटील. केवळ दीड एकरामध्ये पाटील यांनी ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन घेतले आहे.मिरज पूर्वभाग ढबू उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. येथून गतवर्षी दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची मुंबई व दिल्ली येथे निर्यात होत होती. आवक वाढल्याने दहा ते पाच रुपयापर्यंत दर घसरले. ही घसरण पाहता यावर्षी अनेक शेतकºयांनी ढबू उत्पादनाकडे पाठ फिरवली. काही शेतकºयांनी ढबूची लागण केली, मात्र मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे रोगराई व मुळकुजव्यामुळे ढबू काढून टाकावा लागला. अशा अनेक संकटांवर मात करीत टाकळी येथील शेतकरी सुधीर पाटील यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. मल्लेवाडी येथे दीड एकरामध्ये जूनमध्ये ढबूच्या रोपांची लागण केली. त्यांनी पहिल्यांदा नांगरट व रोटर मारून बेड तयार करून घेतला. रसायन व शेणखत घातले. त्याच्यावर परत मातीचा बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून जून महिन्यात सव्वा फुटावर एक छिद्र मारून ढबूचे रोप लावले. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दीड एकरामध्ये १४ हजार रोपांची लागवड केली. रोपांची लागवड केल्यापासून ४८ दिवसांत पहिली तोड आली. साडेचार महिन्यांमध्ये त्यांनी ५२ टन ढबूचे उत्पादन घेऊन १२ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजून दोन महिन्यांपर्यंत ढबूची तोड चालू राहणार आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी वाढ होणार आहे. आवक कमी झाल्याने किलोस २५ रुपये दर मिळत आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य भागात पाटील यांच्या ढबूची विक्री होत आहे.देशांतर्गत निर्यात घटलीपूर्वभागात द्राक्षबागा तोट्यात असल्याने बरेच शेतकरी ढबू उत्पादनाकडे वळले होते; मात्र गतवर्षी दर घसरल्याने यावर्षी मोजक्याच शेतकºयांनी ढबू उत्पादन घेतले आहे. पावसामुळे शेकडो एकर ढबूचे फड काढून टाकावे लागले. पूर्वभागात दरवर्षी सुमारे पाचशे एकरामधून दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची निर्यात देशभरात होत होती. मात्र आता आठवड्यास केवळ २० ते २५ टन ढबूची निर्यात होत आहे.
दीड एकरात ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:03 AM