लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, पेठ या संस्थेला २०२०-२१ मध्ये २४ लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष भांबुरे यांनी दिली आहे. ते म्हणाले संस्थापक युवा नेते अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सुरू आहे. २०२०-२०२१ संस्थेने ११ कोटी ५३ लाख ६० हजार इतका व्यवसाय केला आहे. संस्थेच्या ७ कोटी ९ लाख इतक्या ठेवी असून सभासदांना त्यांच्या गरजेनुसार ४ कोटी ४४ लाख इतका कर्ज पुरवठा केला आहे. संस्थेची गुंतवणूक ३ कोटी ७६ लाख इतकी आहे. संस्था उज्ज्वल भविष्याचे दिशेने वाटचाल करत आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी नायकल, संचालक अशोक पाटील, विकास मगदूम, दीपक माळी, अमोल भांबुरे, अविनाश पाटील, विजय मधाळे, अंकुश मस्के, सरदार जमादार, कुंदाताई साळुंखे, पद्मावती माळी, सचिव विक्रम कदम उपस्थित होते.