इस्लामपूर : श्री व्यंकटेश्वरा शैक्षणिक संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी काढले. पेठ (ता. वाळवा) येथील महाडिक शैक्षणिक संकुलास त्यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
डॉ. शिर्के यांचा संस्थेचे उपाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, अधिसभेचे सदस्य पंकज मेहता, श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी संकुलातील वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
डॉ. शिर्के म्हणाले, श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे.
सम्राट महाडिक म्हणाले, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा अनुभव प्रचंड मोठा असून शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीसाठी त्यांचे मार्गदर्शन नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रा. महेश जोशी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे, डॉ. संतोष वाडकर, प्राचार्या डॉ. वैशाली माने आदी उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा .नीलेश साने यांनी आभार मानले. प्रा. प्रियांका जानकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो -०७१२२०२०-आयएसएलएम-महाडिक न्यूज
पेठ (ता. वाळवा) येथे महाडिक शैक्षणिक संकुलात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा सत्कार सम्राट महाडिक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. महेश जोशी, प्राचार्य ए. ए. मिरजे, डॉ. संतोष वाडकर, प्रा. नीलेश साने उपस्थित होते.