विटा येथे शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेच्या शिवाजी चौक शाखेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष साळुंखे बोलत होते. यावेळी आ. मोहनराव कदम, उपाध्यक्ष हणमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, अशोकराव साळुंखे उपस्थित होते.
वर्धापनदिनी एका दिवसात संस्थेकडे ७५ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या.
कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी शिवप्रताप पतसंस्था लवकरच १५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणार असून, कऱ्हाड, इस्लामपूर, इचलकरंजी, अथणी व भाळवणी या पाच नव्या शाखा सुरू करत असल्याचे सांगितले. तर शाखाधिकारी हणमंतराव पाटील यांनी संस्थेच्या शिवाजी चौक शाखेने २३ कोटी रुपयांच्या ठेवी व १५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचे सांगितले.
यावेळी दिलीप पाटील, तुकाराम गायकवाड, मुरगप्पा सगरे, रवींद्र शिंदे, सरव्यवस्थापक धोंडीराम जाधव, सिकंदर शेख, सुजाता भिसे, प्रभाकर सगरे, सुनील निकम, श्री नेने, जालिंदर तारळेकर, रामचंद्र गुरव, आनंदराव लवटे, महादेव गायकवाड, अरविंद निकम, सिध्दनाथ निकम, सचिन हारूगडे, अमर जाधव, हणमंत जगताप, दादासाहेब पाटील उपस्थित होते.
फोटो - १२०२२०२१-विटा-शिवप्रताप : विटा येथील शिवप्रताप पतसंस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्याहस्ते सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलराव साळुंखे, हणमंतराव सपकाळ उपस्थित होते.