सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीस गेल्या दीड महिन्यापासून सुरुवात झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी एक आठवड्याने लांबणीवर गेली आहे. येत्या २३ जूनरोजी पुन्हा तत्कालीन माजी संचालक व अधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर सुनावणीचे कामकाज सुरू आहे. याप्रकरणी बॅँक कर्मचाऱ्यांनी गत आठवड्यात लेखी म्हणणे सादर केले आहे. ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. (प्रतिनिधी)
वसंतदादा बॅँकेची सुनावणी लांबणीवर
By admin | Published: June 16, 2015 11:05 PM