शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

कोरोनाने मृत ५७४ कर्जदारांची मालमत्ता पडली बँकांकडे गहाण, सांगलीत साडेएकवीस कोटींची थकबाकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 5:01 PM

घरातील कर्ताच काळाने हिरावल्याने या कुटुंबांसमोर विस्कटलेली घडी सावरण्याचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न

सांगली : कोरोना संसर्गामुळे कर्ता हरविल्यामुळे कुटुंबाची घडी विस्कटली आहे. जिल्ह्यात अशा ५७४ मृतांच्या नावे २१ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यांचे घर, प्लॉट, शेती बँकांकडे गहाण आहे. या खातेदारांच्या कर्जमाफीविषयी शासनस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सहकार आयुक्तांनी उपनिबंधकांकडे माहिती मागितली होती. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती गोळा केली जात आहे.जिल्ह्यात ५५१७ नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्गामुळे अनेक समस्या उद्भवल्या. अनेक बालके अनाथ झाली, तर अनेक कुटुंबांचा कर्ता हरविला. त्यामुळे कुटुंबांना याची झळ पोहोचली. या मालमत्ता घर, प्लॉट, शेती आदी बँकांकडे गहाण आहे. घरातील कर्ताच काळाने हिरावल्याने या कुटुंबांसमोर आता विस्कटलेली घडी सावरण्याचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून बँकांची कर्ज कुठून भरायची, असा प्रश्न कुटुंबीयांना सतावत आहे. याविषयी शासनाने विहित प्रपत्रात माहिती मागितली होती. यामध्ये तारण मालमत्ता, गहाण असलेली मालमत्ता, थकीत कर्ज अशी माहिती मागविली आहे. सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे कोरोनात मृत झालेल्या कुटुंबीयांच्या कर्जाची माहिती मागविली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दहा बँकांमधील ५४ कर्जदारांनी आठ कोटी ९५ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जदाराचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सहा कोटी ८० लाख रुपये कर्ज त्यांच्या नावावर थकीत आहे. जिल्ह्यातील ६६ पतसंस्थांमधून १४८ कर्जदारांनी १० कोटी ५९ लाख रुपये कर्ज घेतले होते. यामध्ये सहा कोटी ३५ लाख रुपये कर्ज थकीत आहे. जिल्हा बँकेकडील ३७२ कर्जदारांनी कर्जदारांनी १० कोटी आठ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी आठ कोटी ५४ लाख कर्जाची थकबाकी व्याजामुळे वाढत आहे. यामध्ये बहुतांशी शेतकरी कर्जदार असल्यामुळे त्यांना शासनाकडून कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना मयत कर्जदारांचे थकीत कर्ज-दहा बँकांकडून ५४ कर्जदारांचे ८ कोटी ९५ लाख-६६ पतसंस्थांकडे १४८ कर्जदारांचे ६ कोटी ३५ लाख-जिल्हा बँक : ३७२ कर्जदारांचे ८ कोटी ५४ लाख

कोरोना संसर्गामुळे मृत थकीत कर्जदाराकडील कर्जाची स्थिती, तारण मालमत्तेची माहिती सहकार आयुक्तांनी मागितली होती. त्या अनुषंगाने माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे. या कर्जदारांना कशाप्रकारे मदत करायची ते शासनच ठरविणार आहे. -मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक