शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

जत तालुक्यात प्रस्तावित रेल्वे मार्ग सर्वेक्षण नामंजूर-: मिरज-विजयपूर, पंढरपूर-विजयपूर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:21 PM

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-

ठळक मुद्देकेंद्राचा निर्णय

जत : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी-विजयपूर (१०८.२४ कि.मी.) हे दोन्ही रेल्वे मार्ग सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते. परंतु विद्यमान केंद्र सरकारने हे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. त्यामुळे तालुक्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर-उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी एक हजार २९४ कोटी ६९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही रेल्वे मार्गांचा पाठपुरावा खा. संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप यांनी २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडे केला होता. त्यामुळे या दोन्ही रेल्वे मार्गांच्या कामाला गती मिळाली होती. परंतु रेल्वे बोर्डाने नोव्हेंबर २०१८ मध्ये हे दोन्ही रेल्वेमार्ग नामंजूर केले आहेत, असे लोकप्रतिनिधींना कळविले आहे.

मागील पाच वर्षांत जत तालुक्यात कºहाड-तासगाव-जत (एनएच २६६), गुहागर-विजापूर (एनएच १६६ ई), इंदापूर-जत (एनएच ९६५ जी), पंढरपूर-उमदी-विजापूर (एनएच ५१६ अ) या राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू झाली आहेत. गोकाक-अथणी-जत या राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम विजयपूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर जत आणि उमदी येथून जाणारी रेल्वे होणे गरजेचे होते. परंतु हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जत तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाला : बसली खीळतालुक्यातून रेल्वे मार्ग जात नसल्यामुळे डाळिंब, द्राक्षे, बोर, केळी आदी शेतीमाल शहरात पाठवताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक व खर्चिक ठरत आहे. कच्चा माल या भागात येण्यासाठी दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योजक या ठिकाणी नवीन उद्योगधंदे उभे करायला तयार होत नाहीत. या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. त्यामुळे हे लोक स्थलांतर करत आहेत. ऊसतोडी, वीटभट्टी, दगड खोदकाम यासह छोट्या-मोठ्या कामांसाठी शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली