सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी सांगली जिल्हा बंद जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सांगली विभागाला ४० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले.बंदमुळे एसटी व शहर बससेवा पूर्णत: बंद राहिली. गुरुवारी एसटीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारीच घेण्यात आला होता. प्रशासनाने पोलिसांशी चर्चा केल्यानंतर गाड्या थांबवून ठेवण्याचे ठरले. बुधवारी सायंकाळी मुक्कामासाठी गावोगावी रवाना झालेल्या गाड्या रात्रीच परत बोलविण्यात आल्या. प्रवाशांना गावात सोडून त्या रिकाम्याच तालुक्याला परतल्या. सांगली स्थानकातून गुरुवारी पहाटे सहा वाजल्यापासून लांब पल्ल्याच्या बारा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामध्ये पुणे, कोल्हापूर, मुंबई आदी गाड्यांचा व शिवशाहीचा समावेश होता. त्यांतर सायंकाळी सहापर्यंत एकही गाडी स्थानकातून बाहेर पडली नाही. यामुळे बसस्थानक परिसर सुनासुना होता.
सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान
By संतोष भिसे | Published: September 07, 2023 6:10 PM