इस्लामपूर : क्रेडाईमुळे सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा दरात सदनिकांची विक्री करता येईल. एका विचाराच्या विकासकांनी एकत्र येऊन टाऊनशीप उभा करणे शक्य आहे. ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा पुरविता येतील. बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात, असे आवाहन क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले.
इस्लामपूरमधील प्रमोटर्स व बिल्डर्सच्या क्रेडाई असोसिएशनचा पदग्रहण कार्यक्रम सिद्धनाथ हॉलमध्ये झाला. नूतन अध्यक्ष गणेश पाटील, यंग डिव्हिजनचे अध्यक्ष उमेश रायगांधी, सचिव सत्यजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत गुणवंत यांच्या कार्यकाळातील कामाची चित्रफीत दाखविण्यात आली. त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रवींद्र खिलारे म्हणाले, महारेराच्या नियमावलीचा अभ्यास असणारा विकासक क्रेडाईचा सदस्य हवा. विद्यानंद बेडेकर (कोल्हापूर) म्हणाले, उद्योगवाढीसाठी आणि प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी क्रेडाई मदत करेल. वाळवा तालुका अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश मोरे म्हणाले, क्रेडाईमुळे प्रमोटर्स आणि बिल्डर्स असोसिएशनला निर्भयता आली आहे.
कार्यवाह महेश माळी यांनी स्वागत केले. गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण फल्ले यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय माने यांनी आभार मानले. यावेळी महेश यादव, दशरथ शेटे, सुनील फारणे, अमोल पाटील, भाविक पटेल, किरीट पटेल, अरविंद भालेकर, राजेंद्र माळी, अभिलाष पाटील, संजय दाभोळे उपस्थित होते.
फोटो : १२ इस्लामपूर २
ओळ : इस्लामपूर येथे क्रेडाईचे उमेश रायगांधी यांचा सत्कार दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश पाटील, महेश मोरे, सुनील फारणे, यशवंत गुणवंत उपस्थित होते.