सांगली : सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पत संस्थेच्या सभासदांना आवश्यकतेनुसार सुलभ कर्जवाटप करावे, अशी मागणी सभासदांच्या वतीने एस. के. हाेर्तिकर, राजेंद्र नागरगोजे, सुधाकर माने यांनी केली. याबाबत संस्थेच्या प्राधिकृत मंडळ अध्यक्षा ऊर्मिला राजमाने यांना निवदेन देण्यात आले.
सभासदाना विनाविलब अकस्मित कर्ज द्या, पगाराच्या तीसपट कर्ज द्या, तीस टक्के रक्कम हातात राहून बसेल तेवढे कर्ज द्या अशी मागणी करण्यात आली आहे. संस्थेत कोणताही गैरव्यवहार, भ्रष्टाचार झालेला नाही. संचालक मंडळ अल्पमतात आले; तसेच संस्थेचे थकीत कर्ज कमी करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागत असल्याची माहिती ऊर्मिला राजमाने यांनी यावेळी शिष्टमंडळास दिली.
यावेळी एस. के. होर्तीकर, सुधाकर माने, राजेंद्र नागरगोजे, मोहन दिंडे, बाबूराव खवेकर, शिवाजी कुकडे, संगीता लाड, संजय वार्गीकर, शिवाजी देसाई, संभाजी माने, दादा यमगार उपस्थित होते.