ओळी : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास आमदार सुधीर गाडगीळ यांच्या फंडातून रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी डाॅ. सुधीर नणंदकर, डाॅ. संजय साळुंखे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या फंडातून येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास (सिव्हिल हॉस्पिटल) रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देण्यात आली.
आ. गाडगीळ म्हणाले की, आमदार फंडातून दोन रुग्णवाहिका खरेदी केल्या असून त्यातील एक महापालिकेच्या कुपवाड विभागास दिली आहे, तर दुसरी सिव्हिल हॉस्पिटलला दिली. सिव्हिलमधील रुग्णवाहिका तब्बल १७ वर्षे जुनी आहे. आणखी एक रुग्णवाहिका सिव्हिलसाठी लवकरच देऊ. डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले, ४०० खाटांचे हे हॉस्पिटल असून या रुग्णवाहिकेचा सिव्हिलला चांगला फायदा होईल. येत्या १५ दिवसांत रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा शेड उभारणार आहोत. डाॅ. साळुंखे म्हणाले की, आमदार फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी ९० लाखांचा निधी गाडगीळ यांनी मंजूर केला आहे. काही दिवसांत त्याचे काम सुरू होईल, असे सांगितले.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश अष्टेकर, प्रशासकीय अधिकारी मनोज दाभाडे, अधिसेविका सीमा चव्हाण, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, संघटक सरचिटणीस दीपक माने उपस्थित होते.