वांगी : कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराला जनता कंटाळली असून, राज्यात महाआघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.वांगी (ता. कडेगाव) येथे कॉँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार मोहनराव कदम, विश्वजित कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, सुरेश मोहिते, मालन मोहिते आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले की, पतंगराव कदम मतदार संघालाच नव्हे, तर महाराष्ट्राला लाभलेले वरदान होते. शिक्षण आणि रोजगार निर्मितीत त्यांचे कार्य उत्तुंग होते. त्यांचे सुपुत्र विश्वजित यांनीही वडिलांच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी मतदार संघात केली आहे.सचिन सावंत म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. यावेळी राज्यावर २ लाख ४० हजार कोटींचे कर्ज होते. त्यानंतर या पाच वर्षांत हे कर्ज पाच लाख कोटींवर गेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या सरकारमधील २१ मंत्र्यांचे घोटाळे समोर आले; परंतु कारवाई झाली नाही. याउलट सरकारविरोधी बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखविली जात आहे. सरकारला त्यांची जागा दाखवा.विक्रमी मताधिक्याने विजय व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा, असे विश्वजित कदम यांनी सांगितले. यावेळी ए. डी. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सखाराम सूर्यवंशी, मारुती चव्हाण, जयसिंग कदम, विठ्ठल मुळीक, दिलीप सूर्यवंशी, हिम्मत देशमुख, सुरेश घार्गे, राजकुवर सूर्यवंशी, शोभाताई मोहिते, नयना शिंदे, गीतांजली पवार, धनाजी सूर्यवंशी, सुनील जगदाळे, अविनाश येवले उपस्थित होते. सरपंच विजय होनमाने यांनी स्वागत केले. बाबासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Maharashtra Election 2019 : युतीच्या कारभारास जनता कंटाळली : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 3:46 PM
: कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराला जनता कंटाळली असून, राज्यात महाआघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देयुतीच्या कारभारास जनता कंटाळली : बाळासाहेब थोरातवांगी (ता. कडेगाव) येथे कॉँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम प्रचार सभा