ओळ :
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखाना कार्यस्थळावर ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ या पुस्तिकेचे प्रकाशन प्रल्हादराव पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दिनकरराव मोरे, डॉ. अतुल भोसले, जितेंद्र पाटील, लिंबाजी पाटील उपस्थित होते.
शिरटे : जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या संचालक मंडळाने तयार केलेल्या ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ या पुस्तिकेचे प्रकाशन राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार यांच्याहस्ते व ज्येष्ठ सभासद दिनकरराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. ही कार्यअहवाल पुस्तिका सर्व सभासद शेतकऱ्यांपर्यंत लवकरच पोहोचविली जाणार आहे.
रेठरे बुद्रुक (ता. वाळवा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, गिरीश पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष जगदीश जगताप म्हणाले की, गेल्या ५ वर्षांपूर्वी कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनेल सत्तेवर आले. तेव्हापासून आजपर्यंत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले आमचे संचालक मंडळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी अविरतपणे काम करत आहे.
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देसाई म्हणाले, डॉ. सुरेश भोसले यांनी उत्कृष्टपणे कारखाना चालवित सभासदांच्या भल्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सभासदांनी पुन्हा एकदा सहकार पॅनेललाच विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवाजीराव थोरात यांनी स्वागत केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम जाधव यांनी आभार मानले.