शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

पुण्याचा संग्राम चौगुले ‘तरूण भारत श्री’

By admin | Published: January 08, 2015 11:22 PM

मिस फ्रान्सिस्काच्या हिट पोझेस

सांगली : महाराष्ट्राचा अव्वल शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले याने शोल्डर व बायसेफ मसल्सच्या जोरावर मानाचा ‘तरुण भारत श्री २०१५’ हा किताब पटकावला. आठ वर्षांच्या खंडानंतर या स्पर्धा झाल्याने तरुण भारत स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. स्पेशल लाईट इफेक्टने या स्पर्धेला सुरेख साज चढविला.जगदीश लाड, महेंद्र चव्हाण व सच्चिंद्र सिंग यांचे आव्हान मोडून काढत संग्रामने विजेतेपद पटकावले. उद्घाटन उत्पादन शुल्क अधिकारी के. शुभेंद्र व मनपा उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी तरुण भारत मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे होते. सचिव महेश पाटील यांनी स्वागत केले. पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व संजय भोकरे यांच्याहस्ते झाले. पंच म्हणून इनायत तेरदाळकर, गौतम खाडिलकर व राजीव जोशी यांनी काम पाहिले. यावेळी गोपीचंद पडळकर, ज्ञानेश कांबळे, बच्चू हलवाई, प्रमोद जगताप, संतोष पाटील, लहू भडेकर, राजेंद्रसिंह वालिया, प्रमोद सूर्यवंशी, उपस्थित होते. स्पर्धेचा अनुक्रमे एक ते पाच क्रमांकाचा अंतिम निकाल असा : ५५ किलो : सुनील सकपाळ, किशोर कदम, योगेश दिमटे, नितीन शिंगवण, शिरीष कणसे. ६० किलो : रामा मायनाक, नितीन म्हात्रे, अरुण पाटील, कुलदीप डेंगे, उमेश पांचाळ. ६५ किलो : स्वप्निल नरवाडकर, विलास घडवले, तौसिफ मोमीन, जगेश दैत, आशिष माने. ७० किलो : चंद्रशेखर पवार, श्रीनिवास वास्के, श्रीनिवास खारवी, फैयाज शेख, किशोर क्षीरसागर. ७५ किलो : संदीप कडू, शोएब पिरजादे, वाहीद मुलाणी, सौरव साळुंखे, रवींद्र जगदाळे. ८० किलो : सच्चिंद्र सिंग, अभिषेक खेडेकर, गौतम शिर्के, शहाजी चौगुले, वैभव वनगडे. ८५ किलो : जगदीश लाड, सुनील जाधव, अनिकेत गवळी, मुजफ्फर शेख, रस्लन नायकवडी. ८५ किलोवरील : संग्राम चौगुले, महेंद्र चव्हाण, देवधर भोईर, नीलेश दांगडे, सागर शिंदे. बेस्ट पोझर : चंद्रशेखर पवार. (प्रतिनिधी)संग्राम चौगुले यास सांगलीत ‘तरुण भारत श्री’ किताब संजय भोकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महेश पाटील, इनायत तेरदाळकर, गौतम खाडिलकर, गोपीचंद पडळकर, शिवाजी सगरे उपस्थित होते.मिस फ्रान्सिस्काच्या हिट पोझेसजिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच महिला शरीरसौष्ठवपटूने स्पर्धेत प्रात्यक्षिके सादर केली. फ्रान्सिस्का ही मलेशियाची खेळाडू असून ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने या स्पर्धेत टॉप टू बॉटम सुंदर पोझेस देत सांगलीकरांची मने जिंकली. तिची प्रात्यक्षिके बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.