शेगाव : नामस्मरण केल्याने मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आपोआप निघून जाऊन प्रपंच व जीवन सुखमय होते. याचे आचरण करून आपले जीवन आनंदी बनवूया, असे प्रतिपादन शिवानुभव मंडप संस्थेचे श्री मरुळशंकर स्वामीजी यांनी केले.
जत येथील संत श्री शिवलिंगव्वा यांच्या ९० व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत मठाचे मठाधिपती आण्णया स्वामी, महादेव स्वामी व श्री संत शिवलिंगव्वा प्रतिष्ठानच्यावतीने हा सप्ताह साजरा केला. यावेळी कन्नूर मठाचे मठाधिपती शिवानंद हिरेमठ, वीरेश हिरेमठ, ॲड. प्रभाकर जाधव, तम्मनगौडा रवी पाटील, डॉ. रवींद्र आरळी, डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ. मल्लिकार्जुन काळगी, डॉ. सरिता पट्टणशेट्टी, डॉ. विवेक राऊत उपस्थित होते.