शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

विद्यमानांना धक्का, माजी सदस्यांना संधी --

By admin | Published: October 06, 2016 12:48 AM

जिल्हा परिषद : नव्या चेहऱ्यांना मिळणार प्रवेश

अशोक डोंबाळे - सांगलीजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार विषय समित्यांच्या सभापतींसह ६० सदस्यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. कवठेमहांकाळमधील सर्वच मतदारसंघ आरक्षित झाले असून वाळवा, कडेगाव, खानापूर तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमी आणि आरक्षित मतदारसंघ जास्त आहेत. पंधरा माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या मतदार संघांवरील आरक्षण उठल्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत ६० टक्के नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ असून कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती मनीषा पाटील यांचा दिघंची मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, तानाजी पाटील यांचा आटपाडी मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तर करगणी गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. यामुळे माजी सदस्य अण्णासाहेब पत्की, विजयसिंह पाटील यांचीही संधी हुकली आहे. खरसुंडी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यामुळे येथून गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मोहनराव भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले यांना लॉटरी लागली आहे.जत तालुक्यातील नऊपैकी उमदी मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यामुळे माजी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकरांची संधी हुकणार आहे. मात्र या जागेवर त्यांचे बंधू माजी सदस्य अ‍ॅड्. चन्नाप्पा होर्तीकर यांना संधी मिळू शकते. संख गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांना मैदानातून बाजूला व्हावे लागणार आहे. मात्र या जागेवर माजी सभापती सुजाता पाटील यांना संधी मिळू शकते. डफळापूर गट सर्वसाधारण खुला झाल्याने सुनील चव्हाण यांच्या कुटुंबापैकी एकजण, जतचे माजी सभापती मन्सूर खतीब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आकाराम मासाळ यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बनाळीचे सदस्य व विद्यमान सभापती संजीवकुमार सावंत यांचा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. जाडरबोबलाद गट खुला झाल्याने येथे इच्छुकांची संख्या मोठी असून, सांगली बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, महादेवअप्पा अंकलगी, माजी सदस्य बसवराज बिराजदार हे स्पर्धेत आहेत.खानापूर तालुक्यामध्ये आरक्षण सोडतीत दुसऱ्या फळीतील नेत्यांना सर्वाधिक झटका बसला आहे. येथून अनेक दिग्गज इच्छुक असताना, लेंगरे, भाळवणी हे दोन मतदारसंघ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. नागेवाडी गटातून अमोल बाबर अथवा सुहास बाबर इच्छुक आहेत.म्हैसाळकर गट अडचणीतमिरज तालुक्यातही एक गट वाढल्यामुळे सदस्य संख्या अकरा झाली आहे. विद्यमान सदस्य भीमराव माने यांचा कवठेपिरान मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी सभापती राजेंद्र माळी यांचा भोसे गटही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. येथून माजी अध्यक्षा कांचन पाटील यांना संधी आहे. म्हैसाळ गटातून मनोज शिंदे-म्हैसाळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर इच्छुक होते, पण हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. बुधगाव गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे विद्यमान सदस्य शिवाजी डोंगरे यांचा मार्ग बंद झाला आहे. तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले. तासगाव शहरासह तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे या सोडतीकडे लक्ष केंद्रित झाले होते. मंत्रालयात ही सोडत झाली. या सोडतीने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील खुल्या प्रवर्गातील दिग्गज असणाऱ्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. अनुसूचित जातीच्या आरक्षणाने पालिकेच्या राजकारणाची समीकरणे बदलली असून, नेत्यांच्या निर्णयावर भवितव्य निश्चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि विशेषत: ही निवड पाच वर्षासाठी कायम राहणार असल्याने, शहरातील सर्वच पक्षांच्या दिग्गज इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. खुल्या प्रवर्गासाठी हे आरक्षण राहील, अशी अपेक्षा असल्याने अनेक इच्छुकांनी आरक्षण जाहीर होण्याआधीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. आरक्षणाच्या उत्सुकतेपोटी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इच्छुक आणि उत्सुक कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालय गाठले होते. मात्र आरक्षण सोडतीने, नेत्यांचा अपवाद वगळता सर्वांचाच भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले.अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांना पुन्हा प्रभागातून नगरसेवक पदावर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खुल्या प्रवर्गासाठी आणि त्यापाठोपाठ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. तसेच आरक्षण जाहीर झालेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून मोजक्याच इच्छुकांची नावे चर्चेत असून, काही पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर) इस्लामपुरात पक्षप्रतोद गटात उत्साह दुणावलाअशोक पाटील -- इस्लामपूरइस्लामपूर शहराचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या गटात उदंड उत्साह संचारला आहे. विरोधी गटातील भाजपचे विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार यांनी या पदासाठी आपणच दावेदार असल्याचे सांगितले आहे, तर कपिल ओसवाल, वैभव पवार यांनी खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक यांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक घेऊनच निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे.इस्लामपूर पालिकेत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. या कालावधित राष्ट्रवादीतील बहुतांश इच्छुकांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे, परंतु पालिकेचा कारभार मात्र पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हेच पाहतात. त्यांनी स्वत:च्या गटाचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय पडणार, याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी सर्वसाधारण गटासाठी खुले व्हावे, यासाठी विजयभाऊ पाटील यांनी देव पाण्यात घातले होते. मात्र राष्ट्रवादीच्याच एन. ए. गु्रपच्या खंडेराव जाधव यांनी आरक्षण पडल्यानंतरच भूमिका स्पष्ट करू, असे सांगून आपणही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचा इशारा दिला होता. ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांनी अद्याप काहीही जाहीर केले नसले तरी तेही इच्छुक असल्याचे वृत्त आहे. नगराध्यक्ष आरक्षण पडण्यापूर्वी विजयभाऊ पाटील आणि चिमण डांगे यांनी एकमेकांना मदतीचा हात देण्याबाबत तह केला होता. आता पद खुले झाल्याने राष्ट्रवादीमधून विजयभाऊ पाटील यांचेच नाव अंतिम होण्याचे बोलले जात आहे.एकीकडे राष्ट्रवादीची भक्कम तयारी असताना विरोधकांची अवस्था बिकट आहे. आरक्षणाचे वृत्त समजताच भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी आपणच दावेदार असल्याचे स्पष्ट केले, तर नगरसेवक कपिल ओसवाल, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार यांनी खासदार राजू शेट्टी, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची बैठक घेऊनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. विटा : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उत्सुकता शिगेला पोहोचविणारी विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्याने प्रमुख इच्छुकांची निराशा झाली. परंतु, महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्याचे समजताच बुधवारी दुपारी सत्ताधारी गटासह विरोधकांनीही शहरात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत जल्लोष केला.व्दिसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आल्यानंतर विटा नगरपरिषदेसाठी दि. २ जुलैला प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणावेळी विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधी शिवसेनेचे अमोल बाबर या दोन दादांच्या हक्काचा समजला जाणारा प्रभाग क्र. १ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष उमेदवारासाठी राखीव झाला, तर आरक्षणामुळे काही प्रभागातून दोन्ही गटातील अनेक इच्छुकांच्या धडाधड दांड्या उडाल्या.प्रभाग आरक्षणात निराशा झाल्याने नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. सोशल मीडियावरून गेल्या दोन महिन्यांपासून नगराध्यक्ष आरक्षणाची चर्चा सुरू झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बुधवारी सोडत काढण्यात आली. मुख्याधिकारी महेश रोकडे यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षपदाचे विटा पालिकेसाठी महिला राखीव आरक्षण जाहीर झाले. हे वृत्त समजताच विटा शहरात कॉँग्रेससह विरोधकांनीही फटाक्यांची आतषबाजी केली. परंतु, या पदाच्या अनेक इच्छुक दावेदारांची मात्र निराशा झाली. हक्काच्या प्रभागात पत्ता कट झाल्याने काही इच्छुकांना आता सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. (वार्ताहर)