शिरटे : क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी राज्यव्यापी होती. आयुष्यभर धर्मनिरपेक्ष विचारसरणी जोपासताना त्यांनी जातीय विचारसरणीला कधीही खत-पाणी घातले नाही. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या नेत्यांच्या होणाऱ्या हत्येला एक अर्थ असून, दडवून ठेवलेल्या विचारांची उबळ आता सर्वत्र येत आहे. हत्या करणाऱ्या या विचारांच्या विरोधात आता लढा उभारण्याची गरज असल्याचे मत माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे उद्योजक सर्जेराव यादव यांनी स्वखर्चातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा व परिसराच्या केलेल्या सुशोभिकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार विश्वासराव पाटील, मोहनराव कदम, अरुण लाड, अॅड. सुभाष पाटील, गौरव नायकवडी, अलकाताई पुजारी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुश्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील व मान्यवरांच्याहस्ते उद्योजक सर्जेराव यादव व त्यांच्या पत्नी माधुरीताई यादव यांचा सत्कार करण्यात आला. सर्जेराव यादव प्रतिष्ठानच्यावतीने हौसाताई पाटील यांच्यावतीने अॅड. सुभाष पाटील, क्रांतिमाता कुसूमताई नायकवडी यांच्यावतीने सरपंच गौरव नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्या अलकाताई पुजारी, सरपंच संजय पाटील, उपसरपंच मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अॅड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.यावेळी हणमंतराव पाटील, दिलीपराव देसाई, बबनराव सावंत, रमेश पाटील, महिपती पाटील, अजित पाटील, बाबूराव पाटील, अंजनाताई पाटील, सर्जेराव पाटील, विश्वास खंडागळे, अभिमन्यू पाटील, युवराज पाटील, शरद साळुंखे, आनंद पाटील, संदीप स्वामी, दिलीप पाटील, सुरेश पाटील, प्रताप पाटील, सुभाष चव्हाण, शरद पाटील, हौसेराव पाटील, शिवाजी पाटील, दिनकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)क्रांतिसिंहांची प्रेरणा : युवकांना मार्गदर्शक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यामुळे वाळव्याची ओळख देशभरात पोहोचली. त्यांच्याच प्रेरणेतून नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखली स्वातंत्र्यसैनिकांची आख्खी पिढी पारतंत्र्यात स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहिली. यातूनच क्रांतिसिंहांचे विचार उमटत राहिले. भावी पिढ्यांना त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
दडवून ठेवलेल्या विचारांची राज्यात उबळ
By admin | Published: December 04, 2015 11:05 PM