सांगली : अल्पसंख्याकांच्या ११ कामांसाठी १ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. त्यांना विविध विकास योजनांचा लाभ होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
अल्पसंख्याक कल्याण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार सुमनताई पाटील, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, नियोजन अधिकारी सरिता यादव, व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर, क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, नितीन नवले, निजाम मुलाणी, विशाल चौगुले, सुरेंद्र वाळवेकर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, मंजूर निधीमधून मुस्लिम दफनभूमीसाठी संरक्षक भिंत, जैन वसाहतींत गटारी बांधकाम, मुस्लिमांसाठी शारीखाना, ईदगाह मैदानांचा विकास आदी कामे केली जातील. महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत उर्दू शाळांसाठी ई - ग्रंथालय, सदभाव मंडप, व्यायामशाळा, क्रीडांगण विकास अशी कामे केली जातील. त्यासाठी ११ कोटी ५२ लाख १६ हजार रुपये इतका निधी अपेक्षित आहे. या कामांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तातडीने द्यावेत.