शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

वायरमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

By admin | Published: December 15, 2014 10:40 PM

राजापुरातील घटना : ठोस उपाययोजना करण्याची गरज

तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पहिलीच नाही, यापूर्वीही अनेक वायरमन धक्क्याने मृत झाले आहेत. एकूणच अशा स्वरुपाच्या जोखमीच्या कामाबाबत वीज वितरण कंपनीने ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे.राजापूरमध्ये विजेच्या धक्क्याने मृत झालेले मदतनीस अशोक सुतार हे जरी वीज वितरणचे अधिकृत कर्मचारी नसले, तरी आज त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी राजापूर ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आंदोलन मिटले. कारवाई झाली, आंदोलन झाले; पण पुढे काय? असे प्रकार अधिकृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीतही झालेले आहेत. त्यांना नियमाप्रमाणे भरपाईही मिळते; पण खरी कहाणी तिथूनच सुरू होते. माणूस गेल्यानंतर कुटुंबाची होणारी अडचण कशी दूर होणार, हा प्रश्नच आहे. तासगाव तालुक्यातील राजापूरच्या घटनेने हे चर्चेत आले आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक गावात वीज वितरण कंपनीचा अधिकृत वायरमन असतोच. गाव लोकसंख्येने, क्षेत्राने मोठे असल्यास वायरमनची संख्याही वाढते. संबंधित वायरमनची तांत्रिक अडचण असल्यास मदतनीस म्हणून काम करणारेही आहेत. वीज वितरण कंपनीने वास्तविक अशा स्वरुपाच्या जोखीम असलेल्या कामांसाठी अधिकृत कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. ते प्रशिक्षितही असले पाहिजेत. त्यांची सुरक्षितता याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी सर्वसामान्यांच्यात चर्चा आहे.प्रत्यक्षात काम करणारे तसेच त्यासाठी आवश्यक असणारी मदत कार्यालय स्तरातून करणारे हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. तासगाव तालुक्यात यापूर्वीही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचे तीन विभाग आहेत. तासगाव ग्रामीण व सावळज या तीन विभागांद्वारे सर्व काम चालते. एकूणच अशा घटनांबाबत आता तरी वीज वितरण कंपनीने सावध व सतर्क होणे गरजेचे आहे. कर्मचारी अधिकृत असो अगर अनधिकृत असो, खांब तर वीज वितरणचाच आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या वायरमनना सूचना देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)पस्तीसजणांवर गुन्हे दाखलराजापूर (ता. तासगाव) येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना मदतनीस अशोक बबन सुतार यांच्या झालेल्या मृत्यूनंतर तासगावात रविवारी राजापूर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोप्रकरणी सुमारे ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तासगाव पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला.