सांगली : केंद्रीय जीएसटी कार्यालयाने मार्केट यार्डातील व्यापाºयांना बजाविलेल्या सेवा कर नोटिसांचा प्रश्न मुंबईतील बैठकीनंतरही अधांतरीच राहिला. पुढील आठवड्यात केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या अध्यक्षांची भेट घेऊन नोटिसींचा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यापाºयांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, कोणताही निर्णय न झाल्याने व्यापाºयांचे आंदोलन सुरुच राहणार आहे.
खा. संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी झालेल्या बैठकीत मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिष्टमंडळाने खासदार पाटील यांच्या पुढाकाराने गोयल यांची भेट घेतली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे शरद शहा, दीपक चौगुले, अडत संघटनेचे राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.हळद, गूळ व बेदाणा हा शेतीमाल असल्याने त्यावर सेवा कर लावता येत नाही. राज्यात अन्य कुठेही अशा नोटिसांचा प्रकार नाही. सांगलीवरच अन्याय होत असल्याची भावना यावेळी व्यापाºयांनी गोयल यांच्यासमोर बोलून दाखविली. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले, हळद आणि बेदाण्यासाठी देशात नावाजलेली बाजारपेठ म्हणून सांगलीला ओळखले जाते.
व्यापारी आणि शेतकºयांत समन्वयाने काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे.यावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यापाºयांचे म्हणणे ऐकूण घेत, अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. केंद्रीय जीएसटीच्या अध्यक्षांची पुढील आठवड्यात भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी व्यापाºयांना सांगितले. पुढील आठवड्यात मंगळवारी अथवा बुधवारी भेट घेऊन तोडगा काढण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सांगलीत आज चर्चामुंबईतील बैठकीत सकारात्मक निर्णय होईल ही व्यापाºयांना अपेक्षा होती. मात्र, आश्वासनाशिवाय काहीही न मिळाल्याने व्यापाºयांत अस्वस्थता होती. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, गोयल यांनी म्हणणे ऐकून घेतले असले तरी, त्यावर निर्णय झालेला नाही. सध्या पदाधिकारी मुंबईत असून शनिवारी सांगलीत व्यापाºयांशी चर्चा करून निर्णय घेऊ.