हवामानाचा फटका
सांगली : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून हवामानात बदल होत आहेत. कधी ढगाळ वातावरण, तर कधी कडाक्याची थंडी असते. या हवामानाचा डाळिंब, द्राक्षबागांना फटका बसत आहे. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांना थंडी पोषक आहे.
सांगलीत स्वच्छतेची कामे रेंगाळली
सांगली : शहरातील अनेक उपनगरांमधील स्वच्छतेची कामे रेंगाळल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कचरा उठाव होत असला तरी, उपनगरांमध्ये रस्ते, परिसराची स्वच्छता, औषध फवारणी, गटारींची स्वच्छता या गोष्टी रेंगाळल्या आहेत. नागरिकांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छता
सांगली : महापालिका प्रशासनाने सांगली शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी औषध फवारणी करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. काही प्रभागात नगरसेवकांनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून, नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे.
सांगली-तासगाव रस्त्याची दुरवस्था
सांगली : सांगली ते तासगाव रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डागडुजी सुरू असली तरी, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे.