कडेगाव : वांगी ता. कडेगाव येथे डॉ.पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या पत्नी व डॉ.विश्वजित कदम यांच्या आई विजयमाला कदम यांची गळाभेट घेतली. आस्थेने विचारपूस केली. यानिमित्ताने कदम आणि गांधी कुटुंबीयातील स्नेहबंधाला उजाळा मिळाला.लोकतीर्थ परिसरात वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी राहुल गांधी निघाले होते. यावेळी विजयमाला कदम व त्यांची भेट झाली. त्यांना नमस्कार करून "कशा आहात? काळजी घ्या असे म्हणत त्यांची गळाभेट घेतली. यावेळी विजयमाला कदम यांच्या समवेत त्यांच्या कन्या डॉ.अस्मिता जगताप व स्नुषा स्वप्नाली कदम या उपस्थित होत्या. यावेळी स्मारकस्थळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सोनहीराचे संचालक राघुनाथराव कदम, जयसिंगराव कदम, डॉ.हणमंतराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, भारती लाड , शांताराम कदम, वैशालीताई कदम, पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम, विजयसिंह कदम, सुरेश कदम, डॉ.जितेश कदम, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, सोनहीराचे कार्यकारी संचालक शरद कदम यांचेसह सर्व कदम कुटुंबीय उपस्थित होते.मोहनराव कदम यांच्याशी संवाद लोकतीर्थ या स्मारकस्थळी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी कुटुंबातील जेष्ठ सदस्य माजी आमदार मोहनराव कदम यांची ओळख करून दिली.यावेळी राहुल गांधी यांनी आमदार मोहनराव कदम यांना नमस्कार करून संवाद साधला. डॉ.पतंगराव कदम यांचे बरोबर आमदार मोहनराव कदम यांनीही तब्बल ६० वर्षे एकनिष्ठ राहून केलेल्या कामाचे कौतुक केले व डॉ.पतंगराव कदम पुतळा अनावरण प्रसंगी फोटो काढताना मोहनराव कदम यांना स्वतः जवळ बोलवून घेतले.
राहुल गांधी यांच्याकडून आस्थेने विजयमाला कदम यांची विचारपूस, कदम-गांधी कुटुंबीयातील स्नेहबंधाला मिळाला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 4:56 PM