शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

राहुलला करायचंय सीमोल्लंघन... पण आर्थिक अडथळ्याच्या शर्यतीने हुकली न्यूझीलंडची संधी

By हणमंत पाटील | Published: October 24, 2023 12:29 PM

देशांतर्गत अनेक ॲथलेटिक स्पर्धांत चमकदार कामगिरी

हणमंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : देशांतर्गत तीन राज्यांतील ॲथलेटिक स्पर्धा त्याने जिंकल्या. गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन - २०२३ या स्पर्धेत त्यांने ३५ ते ३९ च्या वयोगटात पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे राहुल शिरसट यांची न्यूझीलंड स्पर्धेसाठी निवड जाहीर झाली. परदेशात सीमोल्लंघन करण्याची इच्छा, तयारी व पात्रता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे राहुलची संधी हुकली.

राहुलचे वडील सुबराव शिरसट हे विटा (जि. सांगली) येथील हातमाग व्यवसायात कामगार म्हणून काम करीत होते. तर, आई विटा नगरपालिकेच्या घुमटमाळ शाळा क्रमांक ७ येथे बालवाडीत सेविका होती. त्यामुळे पूर्वीपासूनच कुटुंबाची अर्थिक परिस्थिती बेताची असल्याने राहुलला लहानपणापासून गरिबीचे चटके बसले. मात्र, हार न मानता त्याने विट्यातील एका लॅबमध्ये रात्रपाळीत काम करून दिवसा महाविद्यालायात जाऊन बीएस्सी पदवी मिळविली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे एका लॅबोरेटरीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम सुरू केले. मात्र, त्याच्यातील खिलाडू वृत्ती त्याने संपू दिली नाही. 

मॅरेथॉनच्या माध्यमातून त्याने सांगली, कोल्हापूर, इंचलकरंजी अशा विविध स्पर्धेत पदके मिळविली. त्यानंतर कर्नाटकमधील बेळगाव येथे ट्रायप्लॉन व सुपरबाइज या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. गोवा येथे आयर्नमॅन २०२३ ची स्पर्धा नुकतीच झाली. त्यामध्ये राहुलने त्याच्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवित आयर्नमन होण्यात यश मिळविले. त्यानंतर न्यूझीलंडसाठी त्याची निवड जाहीर करण्यात आली. मात्र, त्यासाठी साधारण चार लाखांपर्यंत खर्च असल्याने त्याने नकार कळविला. परंतु, अर्थिक  परिस्थितीपुढे हार न मानता त्याचे प्रयत्न सुरुच आहेत. अजूनही जिद्द सोडली नाय...

गोव्यातील स्पर्धेत यश मिळाल्याने माझी निवड न्यूझीलंडसाठी जाहीर झाली. माझी अर्थिक परिस्थिती नसल्याने मी लगेच नकार कळविला. त्यामुळे उपविजेत्या स्पर्धाकाला ती संधी मिळाली. परंतु, मी जिद्द सोडलेली नाही. पुढील सहा महिन्यांत कझाकिस्तान येथे ‘फुल आयर्नमॅन’ ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी एका बाजूला सराव आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक परिस्थिती सुधारणे अशा दोन्ही आघाड्यांवर लढत आहे, असे राहुलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  कर्जाने घेतली सायकल

राहुलने आयर्नमॅन स्पर्धेसाठी २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केले. त्यासाठी सातारा येथील एका डॉक्टरकडून सेकंड हॅण्ड सायकल घेण्यासाठी कर्ज घेतले. आता कझाकिस्तान येथील ‘फुल आयर्नमॅन’ स्पर्धा जिंकण्यासाठी त्याच्या जिद्दीच्या पंखाला आर्थिक बळाची आवश्यकता आहे.

टॅग्स :Sangliसांगली