कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील मटका अड्ड्यावर कुपवाड पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. कारवाईत एका मटका एजंटास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळील ३७ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धनंजय अजित आरभट्टी (वय २८, रा. दत्तनगर, बामणोली) असे अटक करण्यात आलेल्या एजंटाचे नाव आहे. पोलिसांनी मटका मालक सतीश चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बामणोली येथील दत्तनगर भागातील एका दुकानाजवळ एक व्यक्ती मटका घेत असल्याची माहिती सहायक निरीक्षक निरज उबाळे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, सहायक फौजदार युवराज पाटील, सतीश माने, इंद्रजित चेळकर, विजय घस्तेे यांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित धनंजय आरभट्टी हा मटका घेत असताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ ३७ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यावेळी पोलिसांनी संशयितास मुद्देमालासह अटक केली, तर मालक सतीश चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.