सांगली : मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले. टोळीकडून पिस्तूल खरेदी करणाºया संशयितांचा शोध घेण्यात आले. या छाप्यात संशयितांचे महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. कदाचित पिस्तूलांचा आणखी साठी हाती लागण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पिस्तुलांची तस्करी करणाºया सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, रा. सिंधु-बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (२७, नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीत त्यांनी ही पिस्तुले मध्य प्रदेशमधील धामनोद या गावातून आणल्याची कबुली दिली होती. चार दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक राजन माने यांचे पथक संशयित खरात व कुंभार या दोघांना घेऊन मध्य प्रदेशला रवाना झाले होते. तेथील पोलिसांच्या मदतीने पथकाने तस्करांचा शोध घेतला. पिस्तूल तयार करणा-या कारखान्याचा मालक प्रतापसिंग भाटिया याच्यासह दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील सनीदेव खरात व संतोष कुंभार हे दोघेच मुख्य तस्कर असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही भाटियाच्या संपर्कात राहून तेथून पिस्तूल व काडतुसे आणत होती. या शस्त्रांची त्यांनी सांगली, कोल्हापूर, सातारासह अन्य जिल्ह्यात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे. शस्त्रे विकत घेणा-या काही संशयितांची नावे मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी तीन स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. या पथकांनी संशयितांच्या शोधासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले आहेत. हे संशयित हाती लागले तर आणखी पिस्तूलांचा साठा सापडण्याची शक्यता आहे. खरात व कुंभार पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक संशयित गायब झाले आहेत. त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे.
तपासाबाबत गोपनियतातपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कमालाची गोपनियता बाळगली आहे. भाटियासोबत अटक केलेल्या संशयितांचे नाव सांगण्यासही त्यांनी नकार दिला. तपास सुरु आहे, लवकरच सर्व माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.