सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला- मिरज रेल्वेमार्गावरील गेट बंद करत असताना त्याखालून जाण्याच्या घाईत रेल्वे गेट तोडून एस. टी. बससुसाट निघून गेली. हा प्रकार रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दुपारी १२़३० वाजता कुडूर्वाडी-मिरज ही गाडी सांगोला स्टेशनवरून सुटण्याच्या तयारीत होती. तत्पूर्वी, गेटमन सांगोला- मिरज मार्गावरील गेट बंद करण्यासाठी खाली खेचत असताना सांगोला आगाराचा चालक राऊत याने सांगोला- बलवडी ही बस (क्र. एम. एच. ४०-८४२०)वेगाने पास करण्याचा प्रयत्न केला.या प्रयत्नात बसच्या कॅरेजला अडकून गेट वेडेवाकडे झाले. एस. टी. बस गेटला अडकताच गेटमनने शिट्टी वाजवून चालकाला थांबण्याचा इशारा देखील केला, परंतु त्याने गेटमनकडे लक्ष दिले नाही.रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊनआपत्कालीन गेट लावून रेल्वे मार्गस्थ केली.
रेल्वेचे गेट तोडून एस. टी. सुसाट, चालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:59 AM