मिरज : कर्नाटकात प्रवास करणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांचे विजयनगर, शेडबाळ व उगार स्थानकांतील थांबे २० जूनपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. स्थानकांच्या दुरुस्ती कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील विजयनगर, शेडबाळ व उगार स्थानकांत फलाटांची उंची वाढविण्यासह अन्य कामे केली जात आहेत. त्यामुळे मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या व कर्नाटकातून मिरजेकडे येणाऱ्या १० एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. मिरज-हुबळी, लोंढा-मिरज, मिरज-कॅसरलाॅक, हुबळी-मिरज, मिरज-लोंढा, कॅसरलाॅक-मिरज या पॅसेंजर गाड्या थांबणार नाहीत. बेंगळूरू-मिरज राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, तिरूपती-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरूपती हरिप्रिया एक्स्प्रेस, मिरज-बेंगळूरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस या एक्सप्रेस गाड्याही थांबणार नाहीत.