शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

सांगलीतील चिंतामणीनगरच्या पुलासाठी रेल्वे रोखणार, नागरिकांच्या बैठकीत निर्णय

By अशोक डोंबाळे | Published: September 20, 2023 6:34 PM

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देणार

सांगली : सांगली ते तासगाव रस्त्यावरील चितांमणीनगर येथील रेल्वे पुलाचे काम बंद ठेवले आहे, याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असतील तर रेल्वे रोखण्याचा निर्णय बुधवारी नागरिकांच्या बैठकीत घेतला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रश्नावर चर्चेसाठी गुरुवार दि. २१ रोजी भेटीची वेळ दिली आहे.चिंतामणीनगर येथील रेल्वे पुलाचे बांधकाम थांबल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कलानगर येथे नागरिकांची बैठक झाली. यावेळी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, माजी नगरसेवक हणमंत पवार, गौतम पवार, पद्माकर जगदाळे, गजानन साळुंखे, नितीन चव्हाण, शिवकुमार शिंदे, नंदू चव्हाण, ॲड. प्रदीप पोळ, महेश साळुंखे, सचिन देसाई, महालिंग हेगडे, विजय माळी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.चिंतामणीनगर येथील रेल्वेच्या पुलासाठी सांगली ते तासगाव रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. यामुळे लाखो प्रवाशांची रोज गैरसोय होत आहे. तरीही प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. याबद्दल रेल्वे रोखो आंदोलन करून प्रशासनाला जागे करूया, अशी मागणी संतप्त नागरिकांनी बैठकीत केली. यावेळी रेल्वेचे अभियंता शंभू चौधारी यांना रेल्वे पुलाच्या थांबलेल्या कामाबद्दल दूरध्वनीवरून जाब विचारला.नागरिकांना जुना बुधगाव रस्त्यावरून जाताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तेथील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. तरीही चिंतामणीनगर येथील पुलाच्या कामांकडे प्रशासन लक्ष देत नाहीत. गेल्या महिन्याभरापासून पुलाचे कामच बंद आहे. अशा पद्धतीने काम चालू राहिल्यास जानेवारी २०२४ मध्ये काम कसे पूर्ण होणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.काम थांबविणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणीही केली. प्रशासन केवळ बघ्याचीच भूमिका घेणार की काय?, असा सवालही नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी पुलाच्या प्रश्नावर गुरुवार दि. २१ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता भेटीची वेळ दिली आहे. या बैठकीत समाधानकारक निर्णय झाला तर ठीक नाही अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा नागरिकांनी निर्णय घेतला.

भुयारी पुलाचा प्रश्न सोडवापूल मोठा होणार असेल तर चिंतामणीनगर, घनश्यामनगर आणि कलानगर येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी पुलाची व्यवस्था केली पाहिजे. याबाबत रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, अशीही आंदोलकांनी मागणी केली.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे